
सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज आणि त्यांचे मुंबईस्थित शिष्य यांची समाधि मंदिरे एकाच स्थळी आता अस्तित्वात आली आहेत. शिष्य परिवार, भक्तजन, भाविक आणि पुढील येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बाणगंगा इथे निर्माण झाले आहे.
भविष्यकालीन समाधी व्यवस्थापन ही काळाची गरज लक्षात घेऊन श्री निसर्गदत्त समाधी चॅरीटेबल ट्रस्ट स्थापन झालाआहे. त्या माध्यमातून हे सांप्रदायिक काम पुढे नेण्याचा विश्वस्तांचा मनोदय आहे. त्यासाठी या ट्रस्टचे जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी सभासदत्व घ्यावे असे या निमित्ताने सर्वाना आवाहन करत आहोत
आत्मरंगात डुंबून गेलेला जीवनमुक्त निरीच्छ साधू एखाद्या निर्जन गुहेत किंवा डोंगराच्या कड्याकपारीत आयुष्यभर आपल्या आत्मसुखात मग्न राहणे पसंत करतो. लोकसंपर्कापासून दूर राहणे त्याला आवडते. आत्मज्ञान प्राप्तीनंतरचे महाराजांचे जीवन रूढार्थाने जरी गिरगावातील दाटीवाटीने गजबजलेल्या वनमाळी भुवन या वास्तूत होते, तरी त्यांची राहणी मात्र कायम जीवनमुक्त साधुसारखी होती. सदा आत्मानुसंधानात ते डुंबलेले होते. लोकसंपर्कापासून ते स्वतःला कटाक्षाने दूर ठेवत होते. आपल्या १५ x १० च्या पोटमाळ्यावर ते अखेरपर्यंत राहिले. अर्थात सूर्यभास्कराचा तेजस्वी प्रकाश जसा कधी लपून राहू शकत नाही तसा या ज्ञानभास्करचा प्रकाश लपू शकला नाही.
अधिक वाचा





सौ.. अनघा मिलिंद कामत
श्री सुभाषचंद्र कमलाकांत धोत्रे
श्रीमती सविता विनय केसरकर
श्री चंद्रशेखर श्रीराम गोगटे
श्री रवींद्र गणपत विचारे
वकील सुपर्णाराज बी. धोत्रे
ही साइट पार्श्वभूमी संगीत (प्रार्थना) वाजवू इच्छिते. तुमची परवानगी आहे का?