सद्गुरू वचन तू हृदयीss धरीs मग ।
सिद्धराम गुरु ss कृपा करीss बघ मग ॥धृ॥
असुनी विदेही झालासीऽ भ्रममय ।
देह तुझे तूss मानसी बंधन ।।
निसर्गदत्त ते सांगी ss गुज तूज ।
ध्यानी धरीss तू ss विसरू नको, कधी मग ..।।१।।
सद्गुरू वचन तू हृदयीsss धरीs मग ।
सिद्धराssम गुरु कृपा करीss बघ मग ॥धृ॥
नुरली चिंताss भव भय भीती ।
सद्गुरू चरणाss धरी दृढ चित्ति ।।
एक तत्व तेऽ नाम जपीs मग |
सिद्धराम गुरु कृपा करीऽ बघ मग ||२||
सद्गुरू वचन तू हृदयीsss धरीs मग ।
सिद्धराssम गुरु कृपा करीss बघ मग ॥धृ॥
सद्गुरू वचन तू हृदयीsss धरीs.....
श्री महाराजांच्या या शिकवणीवर प्रार्थना रचलेली आहे.....
सद्गुरूवचन विश्वासे, मानी परमेश्वर सर्वत्र असे ! तुझ्या कायेत परमात्मस्वरूप आहे हे ध्यानी ठेवून त्या ध्यानाने ध्यान करतो. सत्शिष्य सद्गुरूवचन प्रमाण मानतो. सद्गुरूवचन म्हणजे जो नाममंत्र आहे ते ओंकारेश्वराचं स्वरूप आहे. एकेश्वराचं स्वरूप आहे. मंत्र आणि ओंकारेश्वर एकच आहे असं स्मरण लाखात एखाद्याजवळ असेल अथवा नसेल. सद्गुरूवचनाचा अर्थ असा घ्या. गुरुवाणीचा जप कसा करायचा?.. वचन न उल्लंघणे. बचन न विसरणे. म्हणजे 'मी चैतन्यब्रह्म आहे' हे केवळ गुरुचे वचन पाळतो. गुरुवचनाला म्हणजेच स्वरूपाला विसरू नका. आपले स्वरूप आपल्या ध्यानात येण्याकरिता सद्गुरूच्या वचनाप्रमाणे प्रतिज्ञाबध्द होत जा. म्हणजे गुरुवचन तेच आपण. गुरूची आठवण राहिली तर गुरुवचनाची आठवण होणारच.
गुरूने सांगितले, 'तू निराकार, विदेही, शुद्धज्ञानस्वरूप आहेस' विवेकाने स्वतःला गुरुचरणी अर्पण करून टाका. हीच गुरुकृपा. तू शुद्ध विदेही आहेस. आताच तुम्ही विदेही आणि व्यापक आहात.
तुम्हाला बंधन आहे ते तुमच्या मनाचे आहे. ध्यानाची मदत आपली बंधने शोधून काढण्यासाठी आणि ती फेकून देण्यासाठी होईल. ईश्वरजातीने व्हाल तेव्हा सर्व मिथ्या आहे हे कळेल आणि तेव्हाच सर्व बंधने तुटतील. भ्रमाच्या आधीचे आपण !! श्रम कोणता ?.. देहरूप माझे मानले हा भ्रम. 'देह मी' अशा अज्ञानाने भ्रम झाला. माया म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे भय. याने वेढल्याने जीव काहीतरी मानून घेतोय आणि म्हणून त्याला काहीतरी अनुभव येतोय. मूळ भ्रमाने भांबावल्यामुळे तुम्ही हिताकरिता धडपडता..
एकतत्व नाम. मनोमय पूजा हे महात्म्य आहे. जेथे जेथे मन जाय, तेथे तेथे सद्गुरूचे पाय. साधकाच्या जीवनात गुरुबद्दलचा विश्वास आणि प्रेम दृढमूल होणंच महत्वाचं आहे. गुरुचे वचन म्हणजे माझे रूप हा साधा निश्चय अंतर्यामी पाळा.